जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये ४६ वा राष्ट्राध्यक्ष
निवडण्यासाठी होणारी निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. सलग दोन वेळा या
पदावर असलेले मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचा
कार्यकाळ संपणार आहे. अमेरिकन घटनेमध्ये
नमूद केल्याप्रमाणे कोणताही राष्ट्राध्यक्ष सलग दोन वेळा या पदावर निवडून येऊ
शकतो नंतर तो या पदासाठी आपली उमेदवारी देऊ शकत नाही.
विविध संदर्भ वापरून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष या पदाकरिता प्रबळ दावेदार
असलेल्या
रिपब्लिकन
आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारांची थोडक्यात माहिती, यांसाठी
असलेली
निवडणूक पद्धत आपल्यासमोर मांडत आहे.
साधारणपणे 1990 नंतरचा कालावधी आणि निवडणुकांचे निकाल बघता प्रत्येक आठ वर्षानंतर
सत्ताबदल झालेला आहे; त्याचप्रमाणे
अमेरिकेच्या 200 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा
राष्ट्राध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार उभी आहे. आता इतिहास घडवायचा कि अजून
काही हे आता काही तासांतच निष्पन्न होईल. कारण जर महिला निवडून आली तर
दोनशे वर्षात प्रथमच महिला राष्ट्राध्यक्ष होतील आणि प्रत्येकी आठ वर्षांनी होणाऱ्या
सत्ताबदलाला चाप बसेल आणि जर तसे नाही झाले म्हणजे ट्रम्प निवडून आले तर आठ
वर्षानंतर सत्ताबदल हे समीकरण ठळक होईल.
सन 2014 च्या जुलै महिन्यात एक गोष्ट साऱ्या जगासमोर आली.
2016च्या उत्तरार्धात रिकाम्या होणाऱ्या व्हाईट हाऊस च्या
किल्ल्या कोणाकडे जाणार...यात प्रामुख्याने नाव घेतले जाते ते सत्ताधारी
डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचे.
वय वर्षे 69 असलेल्या क्लिंटन बाई यांनी आपल्या प्रचाराचा नारळ
दिनांक 12 एप्रिल
2015 रोजी
फोडला तो युट्युब या सोशल माध्यमाद्वारे...त्यानंतर त्यांनी दोन
महिन्यानंतर
पहिली जाहीर सभा घेतली; तेव्हपासून
आजतागायत त्या प्रचार करत आहे.
त्यांची
राजकारणात सुरुवात 1968 मध्ये
झाली. अर्कान्सा राज्याचा फर्स्ट लेडी, अमेरिका फर्स्ट लेडी
त्यानंतर सिनेटर, परराष्ट्र मंत्री यांमुळे क्लिंटन बाईंना
या कामाचा जरा जास्तच अनुभव असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या प्रचार काळात
त्यांचा अजेंडा मुख्यत्वेकरून कर, शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध,
महिलांचे प्रश्न यांवर होता. परराष्ट्र मंत्री असतानाच्या काळात
त्यांनी महिलांच्या आधिकार क्षेत्रात, निःशस्त्रीकरणाच्या
क्षेत्रात, बालकामगारांच्या हक्कांसंदर्भात, मानवीअधिकारांसंदर्भात, आण्विक क्षेत्रात क्लिंटन
यांनी भरीव कामगिरी केलेली आहे.
वयाची
सत्तरी गाठलेले ट्रम्प बाबा तसे पूर्णपणे व्यावसायिक; पण व्यवसाय तरी किती करणार...जनतेचे सेवक होऊन
देशसेवा करणे हेच त्यांनी आद्यकर्तव्य मानले. 1999 मध्ये
ट्रम्प हे रीफोर्म पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी उभे होते पण कालांतराने
त्यांनी माघार घेतली. 2016च्या निवडणुकीसाठी 16 जून 2015 पासून त्यांनी
प्रचार चालू केला. रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी 17 स्पर्धकांमधून यांची निवड झाली. बेछूट वक्तव्ये असले तरी लोकांच्या मनाचा
वेध घेणारे वास्तववादी वक्तव्ये असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.
प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी अत्यंत गहन आणि गंभीर अश्या दोन विषयांना हात घातला;
पहिला म्हणजे इस्लाम आणि दुसरा निर्वासित यांना विरोध. 9/11चा भीषण दहशतवादी हल्ला घडल्यानंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये इस्लामविरोधी
वातावरण तयार व्हायला लागले. त्याच प्रमाणे ट्रम्प यांनी प्रस्थापितांना
निर्वासितांमुळे बसणारा धक्का यावर विवेचन केले. 2008 नंतर
संपूर्ण अमेरिकेची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीच्या प्रवाहातून जात आहे; अद्यापही हा देश पाहिजे तसा सावरला नाही. देशातील गरिबी बेरोजगारी हे
प्रश्न आ वासून उभे आहे, हे सर्व प्रश्न मांडताना ट्रम्प
मागील आठ वर्षांच्या ओबामा प्रशासनाला जबाबदार धरत आहेत त्यामुळे लोकांचा काही
प्रमाणात कल त्यांना मिळत आहे.तस बघितल
तर दोघांकडेही जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे निकाल नक्कीच श्वास
रोखून
धरायला लावणार असे चित्र तयार झालेले आहे. रिपब्लिकन पक्ष असो अथवा
डेमोक्रेटिक
पक्ष या दोन्हीही पक्षांसोबत आपल्या देशाचे संबंध सौदार्हपूर्ण आहे. स्वतः बिल
क्लिंटन 5 दिवसांच्या
भारत दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी तब्बल 22
करारांवर
सह्या केल्या होत्या. शीतयुद्धानंतर संपूर्ण जगाने या घटनेकडे वेगळ्याच
नजरेने
बघितले होते. कालांतराने बुश यांनी भारतासोबत नागरी अणु करार केला.
अश्या
प्रकारचा नागरी अणु करार अमेरिकेने फक्त भारतासोबतच केलेला आहे. नंतर आलेल्या
ओबामा प्रशासनाने हेच संबंध अधिक कसे वृद्धींगत होतील याकडे लक्ष
दिले; मग त्यात
दोन वेळा भारत भेट असो अथवा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण
असो आपली मैत्री बहारन्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे दोन्हीपैकी कोणताही पक्ष सत्तेत आला
तरी भारत अमेरिका यांवर याचा
जास्त काही परिणाम होणार नाही अस दिसतंय;
पण तरीही सत्तांतरनानंतर अमेरिकेचे पाकिस्तानविषयीचे धोरण काय असेल हा भारतासाठी कळीचा मुद्दा
आहे. हिलरी आणि
ट्रम्प या दोघांनीही पाकिस्तान दहशतवादाचा वेळोवेळी निषेध नोंदवला आहे.
त्यामुळे यांचे भविष्यातील धोरण पाकधार्जिणे असणार नाही अशी सध्या तरी शक्यता
वर्तविण्यात येत आहे.खरा जटील प्रश्न आहे तो अमेरिकेच्या चीन विषयीच्या धोरणाचा. रिपब्लिकन पक्ष हा चीन बाबत अगदी कडवे
धोरण घेऊन आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडीची पद्धत कशी असते हे सोप्या
भाषेत बघूया..
अमेरिका हा राज्यांचा संघ आहे. तिथे राज्य महत्वाचे आहे.म्हणून त्याला UNIED
STATE OF AMERICA असे म्हणतात. या ठिकाणी
संपूर्ण राज्य एक मतदारसंघ असतो. यांची निर्वाचक संख्या हि लोकसंख्येच्या प्रमाणात असते.
उदाहरण
घ्यायचे झाल्यास
कॅलिफोर्निया या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक 3.9
कोटी आहे; आणि तिथे 55 निर्वाचक आहे. त्याखालोखाल टेक्सास प्रांतात 38
निर्वाचक आहेत तर सर्वात कमी वायोनिंग प्रांतात लोकसंख्या अवधी 6 लाख आहे; त्यामुळे त्या ठिकाणी
3 निर्वाचक आहेत. महत्वाची आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे
या देशात निर्वाचाकांना
कायदे बनविण्यात किंवा त्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही
त्यांना फक्त राष्ट्राध्यक्ष निवडून देण्याची मोठी कामगिरी असते.
मतदान हे
लोकसंखेच्या प्रमाणात कोणत्या पक्षाला किती आहे यावरून विजयी कोण हे समजते.
म्हणजे असे कि, वायोनिंग
प्रांतात लोकसंख्या 6लाख आहे; त्यापैकी
4लाख जनतेने रिपब्लिकन पक्षाला मत दिल आणि 3 लाख जनतेने अन्य दुसऱ्या पक्षाला. 4 लाख मत दिलेला रिपब्लिकन पक्ष वायोनिंग प्रांताचे
नेतृत्व करेल म्हणजे ते राज्य पूर्ण रिपब्लिकन पक्षाचे होईल.सध्याच्या
घडीला अमेरिकेमध्ये एकूण 538 इतके
निर्वाचक निवडून द्यावयाचे आहेत. यापैकी 435 हे हाउस ऑफ रीप्रेझेंटेटिव्ह, 100 हे सिनेट आणि उरलेले तीन डीस्ट्रीक्ट ऑफ
कोलंबिया मधून निवडले जाणार आहे. यामध्ये 270
हा जादुई आकडा ठरणार आहे. 270 मत ज्याच्या झोळीत त्याच्या हाती व्हाईट हाउस च्या
किल्ल्या.
सद्यस्थितीला
क्लिंटन यांच्याकडे 217 तर
ट्रम्प यांच्याकडे 191 मत हे पक्के आहेत.
पण 270 आकडा गाठण्यासाठी सर्व कौशल्य प्रमुख 10 राज्यांत पणाला लावावे
लागणार
आहे. यामध्ये फ्लोरिडा 29, पेनसेल्वेनिया
20, ओहायो 18, नॉर्थ कॅरोलायना
15, व्हर्जिनिया
13, विस्कोन्सिन 10, कोलोरडो 9,
आयोवा आणि नेवाडा प्रत्येकी 6,
आणि न्यू
हंपशायर 4. या
राज्यांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. या
राज्यांना
युद्धभू राज्ये म्हणूनही ओळखले जातात.
अमेरिका निवडणुक 2016 एकूण मतदारसंघातील प्रमाण :
श्वेतवर्णीय : 15कोटी 60 लाख 84 हजार
कृष्णवर्णीय : 2 कोटी 74 लाख 02 हजार
हिस्पॅनिक : 2 कोटी 73 लाख 02 हजार
आशियाई : 92 लाख 86 हजार
|
स्थानिक
वेळेनुसार सकाळी 6-7 वाजेच्या
सुमारास मतदानाला सुरुवात होईल. अमेरिकेमध्ये काही ठिकाणी 6 काही ठिकाणी 7 तर काही
ठिकाणी 9 वाजता मतदान सुरु होईल. सहा टाईम्स झोन मध्ये हा
विस्तृत भूभाग पसरलेला आहे. मतमोजणी प्रक्रिया लगेचच 9 नोव्हेंबरला असल्याने
राष्ट्राध्यक्ष कोण हे समजेल पण त्याची अधिकृत घोषणा हि 6 जानेवारी 2017 लाच होईल.
निवडणूक
कोणतीही असो आणि कुठेही असो ‘सत्ता खेचायची असते आणि खेचून ती गाजवायची असते’ हा नियम मात्र सगळीकडे लागू ठरतो. मग ती सत्ता
खेचण्यासाठी साम, दाम,
दंड, भेद या नीतीचा अवलंब केला तरी त्यात काही
नवल नाही. शेवटी असल्या खेळात विजयश्री त्याच्याच गळ्यात माळ घालते जो दूरदृष्टी ठेवून वर्तमान
जगतो.
(संदर्भ : दैनिक लोकसत्ता, दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, विकिपिडिया. फोटो संदर्भ : गुगल )
Superbbbbbb bro
ReplyDelete