Monday, October 10, 2016

मुद्रा मुळे आर्थिक प्रगती..

लासलगावच्या मनोहर जाधव यांच्या व्यवसायालामुद्रामुळे चालना
लासलगाव येथे घड्याळ दुरुस्तीचे काम करणाऱ्याल मनोहर  जाधव यांनी मुद्रा बँक योजनेतून मिळालेल्या  कर्जातून सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय सुरू केल्याने त्यांचे उत्पन्न वाढले आहे.

मोबाईलच्या युगात तरुणाईचा कल घड्याळाकडे फारसा नाही. तसेच या व्यवसायात स्थिरता आल्याने श्री.जाधव नवा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होते. वडिलोपार्जित व्यवसाय बदलणे सहजपणे घडत नाही. मात्र जाधव यांना मुद्रा बँक योजनेमुळे प्रोत्साहन मिळाले. बाजारात सौंदर्य प्रसाधनांना ग्राहकवर्ग जास्त असल्याचे त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय करताना पाहिले होते. त्यामुळे त्यांनी सौंदर्य प्रसाधनांचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला.


बँक ऑफ महाराष्ट्रच्या लासलगाव शाखेने मुद्रा बँक योजनेच्या शिशु गटांतर्गत त्यांना कर्ज देण्याची तयारी दर्शविली. जाधव यांनी दरम्यान मित्राकडून सौंदर्य प्रसाधन व्यवसायाची संपुर्ण माहिती मिळविली. त्यानुसार  बँक ऑफ महाराष्ट्रकडून 50 हजाराचे कर्ज मिळाल्यानंतर त्यांनी घड्याळ दुरूस्ती संपुर्णपणे बंद करून नवा व्यवसाय सुरू केला.

गेल्या मार्चपासून ते या व्यवसायात आहेत. पूर्वी घर चालविण्यासाठी  आणि अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्चाची समस्या होती. आता कुटुंबाचा खर्च सुरळीतपणे सुरू आहे. भांडवल वाढल्यामुळे नाशिकऐवजी मुंबईहून माल दुकानात येत असल्याने फायदा वाढला आहे. 1500 रुपयांच्या हप्त्याची परतफेडहीनियमितरित्या होत आहे. एकूणच शासनच्या या योजनेतून झालेल्या मदतीतून त्यांना आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग गवसला आहे.

मनोहर जाधव-
पूर्वापार चालत आलेला व्यवसायातून आर्थिक गणित व्यवस्थित जमत नव्हते.नवा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असल्याने कुटुंबाच्या गरजा चांगल्याप्रकारे पुर्ण करता येतात.  सरकारची ही योजना अतिशय चांगली आहे. माझ्यासारख्या होतकरू व्यक्तिंना योजनेमुळे फायदा होत आहे.

         @vskatkade
         katkade.vaibhav@gmail.com


No comments:

Post a Comment

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...