प्रकाशनाचा विक्रम
आयुष्यात बऱ्याचदा नैराश्य येत असते. याच नैराश्याच्या विळख्यात अडकून जीवन
संपविण्याचा कोणी विचार करत असत किंबहुना काही नैराश्यग्रस्त व्यक्ती आत्महत्येचा
प्रयत्न देखील करतात; परंतु जीवन संपवायचं असेल तर आपण संपवू पण त्याआधी एकदा
जगाला दाखवून देऊ कि आपण सर्वोत्तम आहोत...असा विचार मनात येऊन नाशिक मधील
पूजा बडेर यांनी आपलानिर्णय बदलला आणि आत्महत्येच्या विचारापासून माघारी परतल्या. वयाच्या
अवघ्या 27 व्यावर्षीएकाच वेळी 21 पुस्तके प्रकाशित करून या तरुणीने एक आगळावेगळा
विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्यासोबत झालेल्या या गप्पांमधून यामागच्या घटनांचा
पट उलगडत गेला...
प्रश्न:-एकाच वेळी 21 पुस्तके प्रकाशित करून एक नवा विक्रमआपण प्रस्थापित केला
आहे; नक्की कोणत्या विषयावर आधारित आहेत हे पुस्तके...?

प्रश्न:- आपण लिखाण केव्हापासून सुरु केलं?
उत्तर
:- वयाच्या चोविसाव्या वर्षापासून मी लिहिते आहे. पण ते लिखाण मी कुठे प्रसिध्द नव्हते
करत. फक्त लिहून कुठेतरी ठेवून द्यायची..
प्रश्न :- अशी काय घटना घडली होती कि आपण आत्महत्येचा प्रयत्न केला...नैराश्याची
भावना आपल्या मनात कशीआली’?
उत्तर:-
मी एका सधनकुटुंबात जन्माला आली. पण लहानपणापासून मी जरा हट्टी होते आणि अभ्यासात
अगदिच मागे होते. माझ्या कुटुंबातले तसेचमाझे मित्रपरिवार सगळे हुशार त्यामुळे माझान्यूनगंडवाढत
गेला. मी या जगात येऊन काहीच करू शकत नाही अस वाटलं. इयत्ता दहावी ला मला फक्त शेकडा55
गुण होते. त्यातच भरीस भर म्हणजे इंग्रजी सारख्या विषयात फक्त 55 गुण...आणि
साहजिकच असे गुण बघितल्यानंतर घरच्यांनी मला खूप बोलणे दिले. तेव्हा मी ठरवले कि
आता अभ्यास आनंद घेऊन करायचा...त्यानंतर मी जी पण परीक्षा दिली त्यामध्ये मी अव्वल
क्रमांकाने उत्तीर्ण झाले.याच काळात कॉमर्स असलेले विद्यार्थी सनदी लेखापाल
परीक्षेची तयार करण्याचा एक ट्रेंड होता मी देखील सनदी लेखापाल परीक्षेची तयारी
करण्याचे ठरवले. या परीक्षेतील पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले पण अचानक अस वाटू
लागले कि सगळे हेच करताय मग आपण काय नवीन करतोय म्हणून या परीक्षेचा अभ्यास सोडून
दिला. मगनवीन आव्हान पेलायचे ठरवले एमबीए ला प्रवेश मिळविण्यासाठी त्याची प्रवेश
परीक्षा पास झाले आणि जेव्हाप्रवेश घेण्यासाठी गेले तेव्हा तिथली गर्दी बघून मी
पुन्हा अस्वस्थ झाले आणि तो हि विचार सोडून दिला. खूप विचार करून मग
विद्यावाचस्पती (पीएच डी) साठी प्रवेश परीक्षा दिली पहिल्या प्रयत्नात ती उत्तीर्ण
झाले. त्यातील दिड वर्ष अगदी व्यवस्थित गेल. त्याच्या सर्व चाचण्यांमध्ये मी
यशस्वी होत होते पण अचानक एक दिवशी अस समजल कि आपण ज्या विद्यापीठातून डॉक्टरेट
मिळविणार आहोत ते विद्यापीठच बोगस आहे; मग मात्र मी पूर्णपणे संपून गेले...काय
कराव सुचत नव्हत. माझी परिस्थिती असल्याने मी पुनःप्रवेशासाठी किंमत मोजू शकणार
होते पण बाकीमाझ्यासोबत असलेल्या त्या विद्यार्थ्यांचं काय कि ज्यांच्या घरात खायला
लवकर मिळत नाही आणि ते शिक्षणासाठी पैसा मोजत आहेत. हेच सर्व नैराश्य आल.. तब्बल
तीन महिने मी घरातच शांत होते या नैराश्यकाळात मी तब्बल सहाशे प्रेरणादायी पुस्तक
वाचले. पण अस एकही पुस्तक नव्हत कि मला त्यातून बाहेर काढू शकेल. आणि नैराश्याने
टोकाची पातळी गाठल्याने मग आत्महत्येसाठी प्रवृत्त झाले. आत्महत्या करायची अस
ठरल्याने मी चिठ्या तयार केल्या आणि ठेवून दिल्या. हात कापून किंवा पंख्याला लटकून
अस काही करायचं नव्हत मग गंगापूर धरण येथे जाऊन पाण्यात उडी मारून जीव द्यायचा. तिथपर्यंत
पोहचले पण उडी मारण्याच्या वेळी एक विचार आला कि जर देवाने हि सगळी परिस्थिती
माझ्यासोबत घडविली आहे त्यामुळे मला दुःख झालय पणमग आत्महत्या करून मला सत्तावीस
वर्ष विनातक्रार सांभाळणाऱ्या आई वडिलांना दुःख देण्याचा मला काय अधिकार आहे. जीवन
संपवायचं असेल तर आपण संपवू पण त्याआधी एकदा जगाला दाखवून देऊ कि आपण सर्वोत्तम आहोत.

प्रश्न:- करिअर म्हणून साहित्य लिखाण
या क्षेत्रात आताची पिढी फार कमी प्रमाणात उतरत आहे किंबहुनापालकांकडूनचया
क्षेत्रात येऊ दिले जात नाही...तुम्हालाहि असा अनुभव आला होता का ?
उत्तर:-
हो. वयाच्या चोविसाव्या वर्षी मी फक्त शिक्षणाचा विचार करत होते आणि दुसरीकडे
लिखाण करत होते. आणि मुलगी म्हटल्यावर साहजिकच आई वडिलांचं प्रथम कर्तव्य म्हणूनलग्नासाठीमाझ
मन तयार करणे. पण वडिलांच्या मित्राने वडिलांचं मन वळवलं आणि त्यामुळे लिहिते
झाले.
प्रश्न:- शालेय जीवनापासून ते आतापर्यंत कुटुंबासोबतच शिक्षकांनीही आपल्याला
साथ दिली. असे कोणते शिक्षक आहेत कि ज्यांनी तुम्हाला नेहमीच आधार दिला?
उत्तर:-
सर्वच शिक्षकआपल्या विद्यार्थ्यांना चांगल शिक्षण देत असतात वेळोवेळी आधार देत
असतात. आणि माझ्या आयुष्यात असे अनेक शिक्षक येऊन गेले कि ज्यांनी मला वेळोवेळी
खूप शिकवलं...पण महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी जेव्हा नाशिकला आले तेव्हा अतुल
अकौंटन्सी चे संचालक मा.अतुल सर यांसोबत भेट झाली.त्यांनी मला भावनिक पातळीवर
समजून घेऊन हृदयस्पर्शी अनुभव दिला वेळोवेळी मला सूचनादेत असायचे आणि महत्वाचे
म्हणजे माझ्या चांगल्या वाईट काळात त्यांनी मला साथ दिली.
प्रश्न:- 23 जून म्हणजे पुस्तक प्रकाशाना पुर्वीचा दिवस आणि 24 जून हा पुस्तक
प्रकाशनाचा दिवस...कश्याप्रकारे आयुष्य बदललं...थोडक्यात सांगा...
उत्तर:-
थोडक्यात म्हणजे.. खूप दिवसांपासून पुस्तकाबाबत चर्चा होत होत्या पण पुस्तक
प्रकाशित होत नव्हत यावरून अनेक अफवा पसरत होत्या आणि जेव्हा सर्वांना प्रकाशनाच्या
निमित्ताने सर्वांना समजले कि एक नाही तर एकवीस पुस्तके एकाच वेळी प्रकाशित झाले त्यानंतर
सर्वचस्तरातूनआमची पूजा अस आपुलकीने लोक सांगायला लागले.
प्रश्न:- आता 21 पुस्तके प्रकाशित झाली आहे अजून काही होणार आहे का आणि केव्हा
?
उत्तर:-
अजून पुस्तके प्रकाशित होणार आहे. मीएका ड्रीम प्रोजेक्ट वर काम करते आहे. त्यामुळे
प्रकाशनाला थोडा विलंब होतो आहे. अंदाजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढचे
पुस्तक मुंबई येथे प्रकाशित होतील.
प्रश्न:- जेष्ठ पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे यांचा उल्लेख वारंवार आपण करता..या
सगळ्यात सरांचा काय वाटा आहे.
उत्तर
:- दिशादर्शक...सर नेहमी काही ना काही सूचना देऊन माझ्याकडून पूर्ण करून घेत
असतात. त्यामुळे त्यांसोबत बसून सर्व चर्चा करायला आनंद मिळतो आणि सर सुद्धा आनंदाने
सर्व गोष्टी समजावून सांगतात.
प्रश्न:- पुस्तकांच्या बाबतीत अशी कोणती घटना आहे कि ज्यामुळे तुमचा आनंद
सर्वोच्च पातळीवर गेला.
उत्तर:-
दोन गोष्टी आहे. माझ्या लेखनाच मसुदाकांबळे सर यांनी एका दमात 7 तासात वाचून
काढला. त्यासाठी प्रस्तावना लिहिली आणि त्या पुस्तकाचे शीर्षक देखील त्यांना आवडले.
आणि दुसरी घटना म्हणजे मी काही प्रेरणादायी वाक्ये सोशल मेडिया मार्फत पसरवत असते
तर एके दिवशी मला संदेश आला कि पूजाजी आपल्या जीवन संपवायचं असेल तर आपण संपवू
पण त्याआधी एकदा जगाला दाखवून देऊ कि आपण सर्वोत्तम आहोत या संदेशामुळे मी
आत्महत्येपासून परावृत्त झालो आहे. धन्यवाद.. हे दोन क्षण असे आहेत कि तेशब्दांच्या
सहाय्याने मी मांडू नाही शकत आणि एक लेखिका म्हणून मला अस वाटत कि माझ्या एवढ्या
लिखाणातून कोणाचे आयुष्य त्याला परत मिळत असेल तर मला माझ बक्षीस मिळाल.
प्रश्न:-लिखानासोबतच आणखी काही गोष्टी आहेत का कि त्यात तुमच मन रमत?

प्रश्न:- सर्व पुस्तके इंग्लिश मध्ये आहेत. मराठी मध्ये भाषांतरित करण्याचे
काही नियोजन आहे का?
उत्तर:-
होय. दिवाळीनंतर सर्व पुस्तके विक्रेत्यांकडेइंग्लिश आणि भाषांतरित याप्रमाणे उपलब्ध
होतील.
प्रश्न:- आपणएका सधन कुटुंबात जन्मलाआहात... आणि आपल्याकडे असा समज आहे कि
लक्ष्मी आणि सरस्वती एकाच ठिकाणी नांदत नाही. तर आपल काय मत आहे यावर..
उत्तर:-
दुर्मिळ ठिकाणी लक्ष्मी असलेल्या ठिकाणी सरस्वती वास करते;पणसरस्वती असेल तिथे
लक्ष्मी पोहचतेच...माझ्याही बाबतीत थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने हे दुर्मिळ ठिकाण
झाले असावे. कुटुंब सधन असले म्हणून संघर्ष कमी असतो अस नाही.. यशस्वी होण्यासाठी
संघर्ष करावाच लागतो.
प्रश्न :- पूजा जी आपणाला पुढील वाटचालीस शुभेच्छा...
उत्तर:-
धन्यवाद.
(शब्दांकन:-
वैभव सुरेश कातकाडे)
प्रस्तुत मुलाखत आपण मराठी वर्ल्ड.कॉम या वेब पेज वर देखील वाचू शकता.
प्रस्तुत मुलाखत आपण मराठी वर्ल्ड.कॉम या वेब पेज वर देखील वाचू शकता.
No comments:
Post a Comment