Monday, August 1, 2016

एकांत...

प्रश्न तीचेच होते आणि उत्तरही तीचेच...
तरी पण तिच्या मनात नेहमीसारखा पेच..

तिची द्विधा मनःस्थिती मनात हलकल्लोळ...
माझ्या मनात मात्र नाजुकसा हास्यकल्लोळ..

नजरेत तिच्या काहीतरी वेगळेच...
मी पण अनुभवत होतो काहीतरी वेगळेच..

मग अचानक पाऊस कोसळला..
ती पण ओली आणि मी पण ओला..

मन दोघांचे चिंब भीजले..
पावसामुळे तिला माझे अश्रु नाही दिसले..

मला समजवण्यात तीला नव्हती कसली भ्रांत...
या साऱ्यात मी फक्त शांत... स्मित-शांत आणि शेवटी एकांत...!!

@वैभव
@vskatkade

No comments:

Post a Comment

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...