Monday, March 4, 2019

सोशल मीडिया आणि आजचा तरुणवर्ग

आजच्या आयुष्यात नातं कसं जपायचं यावर समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे कुठलीही छोटीशी गोष्ट छोटी न राहता लगेच निर्णायक टोक गाठत असेल तर नक्कीच समुपदेशनाची आवश्यकता आहे.

आज ची पीढ़ी म्हणजे पूर्णपणे टेकी म्हणावी लागेल. पण या टेकी पीढ़ीचा सर्वात घातक परिणाम कुठला असेल तर तो म्हणजे फक्त मेसेज,इमेज यांवरुन व्यक्ति ओळखणं त्या व्यक्तीला जसं दिसतंय तसं ठरवून टाकणं नव्हे नव्हे तर त्यावर शिक्कामोर्तब देखील करणं. मग समोरच्या व्यक्तिने तशी आभासि प्रतिमा तयार केलेली असेल तरीही किंवा नसेल तरीही..

याचा सर्वात मोठा फटका नासमज म्हणजे ज्यांना अजुन आई वडील आपले कुटुंब आपल्यासाठी काय आहे हे समजले नाही तरी ते आपला तथाकथित जीवनसाथी सोशल मिडिया वर शोधत फिरतात त्यांना..

खऱ्या नात्याची किंमतच सोशल मीडिया नामक काचेच्या शस्त्रातून संपून जाते. आजच्या युवा पीढ़ी मध्ये हे असले प्रकार सर्रास घडत असताना दिसत असतात. यामध्ये प्रामुख्याने एक वर्ग येतो तो तथाकथित लिब्रल समजल्या जाणाऱ्या युवावर्गाचा.. मग एका पर्याप्त पातळी नंतर हीच युवा पीढ़ी असते जी खऱ्या प्रेमाला शोधत फिरते. आधुनिक  समाजव्यवस्थेला बळी पडलेली ही युवा पीढ़ी.. नात्यांमधला गोडवाच ही विसरलेली असते किंबहुना नात्यांमधील गोडवा काय आणि कसा असतो हे सोशल मिडिया नामक राक्षसाने यांना समजूच् दिलेला नसतो..

इंस्टाग्राम द्वारे फ़ोटो, व्हाट्सप्प द्वारे चॅटींग, टिक टॉक द्वारे इम्प्रेशन आणि फेसबुक तर या सर्वांचे वडील.. यातून आजच्या मुलामुलींची सुटकाच होत नाही. परिणामी आई वडिलांशी उडणारे खटके, खुप लांबचे वाटनारे मोठे भाऊ बहिण हे ओघाने येतच. मग यांचीच पोकळी भरून काढण्या करिता शोध घेतला जातो तो सोशलमीडियाचा आणि त्यात आभासी वृत्तीने भारलेल्या आभासी व्यक्तीमत्वांचा.. एकदा का त्यांसोबत मेटकुट जमायला सुरुवात झाली की कुटुंब फक्त नावालाच राहत.

एका अभ्यासाअंती असे समोर आले आहे की आजचा तरुण वर्ग फ़क्त कोणाचा न कोणाचा खांदा शोधतोय. एका नात्यासोबत बिनसल की त्या पासून "डिस्ट्रेक्ट होण्यासाठी दुसर नातं अट्रैक्ट साठी पाहिजे. हे नॉर्मल झालं तर मग ओके नाही तर परत आहेच डिस्ट्रैट.. म्हणजे हां खेळ अट्रैक्ट डिस्ट्रैक्टचाच होतो आणि यामुळे नात्यांमधला समंजसपना एकमेकांना समजून घेण्याची भावना लुप्त होते. आणि मग  नातं म्हणजे एक खेळच होऊन बसतो असल्यां लोकांसाठी.

-वैभव सुरेश कातकाडे
katkade.vaibhav04@gmail.com

4 comments:

  1. Khup chan vaibhav...
    खरच सोशल मिडीयासारख्या आभासी जगात वावरणाऱ्या तरुणांना वेळीच नात्यातील भावनिकता लक्षात येण आवश्यक आहे.. यावर उपाय काय करता येतील.. याबाबतही आपण लिहाव

    ReplyDelete

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...