शेतकरी कुटुंबियांना आधार
शासनाच्या अनेक योजनांच्या
माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न
करण्यात येत आहे. जलयुक्त शिवारसारख्या योजना यशस्वी होत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या
कुटुंबियांची काळजी घेऊन त्यांच्या पाठीशी
शासन असल्याचा विश्वास देण्याचाही शासनाचा
प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात
विमा योजना याच उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही योजना चांगल्यारितीने राबविण्यात येत आहे.
फोटो सौजन्य -: मनोज अहिरे (८९२८३५२२३६) |
कृषी क्षेत्र हे देशाच्या
अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भूमिका बजावत असते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहे. शेतकरी हे कृषी क्षेत्रात
व्यवसाय करत असतात. या मध्ये कार्यरत असताना अनेक अडचणी, आपत्तींना तोंड द्यावे लागत असते.
काहीवेळा अपघातामुळे अपंगत्व आल्याने किंवा मृत्यु ओढावल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. आपत्तीच्या
काळात शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2015 मध्ये
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरु केली. या योजनेमुळे अपघातग्रस्त कुटुंबियांना लाभ मिळाल्याचे चित्र दिसत
आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 101 अर्जांची नोंदणी झाली असून 67 अपघातग्रस्त कुटुंबियांना
या योजनेंतर्गत लाभ झाला आहे. उर्वरित प्रस्ताव मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यातून अपघातग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निश्चितपणे दिलासा मिळणार आहे.
योजनेंतर्गत वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक तसेच नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात
यांमुळे अनेक शेतकरी दगावतात अथवा त्यांना अपंगत्व येते त्यांसाठी हि योजना आहे. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना रुपये 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा
दोन अवयव निकामी झाल्यास (अपंगत्व) रुपये 2 लाख, अपघातामुळे एक डोळा व एक
अवयव निकामी झाल्यास (अपंगत्व) रुपये 2 लाख आणि अपघातामुळे एक
डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास (अपंगत्व) रुपये 1 लाख इतकी नुकसान भरपाई
म्हणून शासनातर्फे देण्यात येत आहे.
फोटो सौजन्य -: मनोज अहिरे (८९२८३५२२३६) |
लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त कुटुंबीयांनी दावा पत्र, वारस नोंद-उतारा 6 क, शेतकऱ्याचा वयाचा पुरावा, पोलीस प्राथमिक तपास अहवाल किंवा जबाब, बँक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, पोलीस स्थळ पंचनामा आणि मृत्यू प्रमाणपत्र इ कागदपत्रांची पूर्तता तालुका कृषी अधिकारी यांकडे करणे आवश्यक आहे.
शासनातर्फे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या
जलयुक्त शिवार, सौर कृषी पंप आणि मागेल त्याला शेततळे अशा विविध योजना राबविण्यात
येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. त्याचबरोबर समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणाऱ्या
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे कुटुंबातील
सदस्याचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न होत
असल्याने त्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण होण्यास मदत होत आहे.
अलका
शांताराम चुंभळे, ता. नाशिक
मागील
वर्षी डिसेंबर महिन्यात पतीचा अपघाती
मृत्यू झाला. भावाने या योजनेची माहिती दिली. कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज
तालुका कृषी अधिकारी यांचे कडे जमा केला. योजनेबाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 2 लाख रुपयांची मदत मिळाली .
|
वैभव सुरेश कातकाडे
@vskatkade
katkade.vaibhav@gmail.com
Superbbbbbb Vaibhav sir
ReplyDelete