मराठा हायस्कूल नाशिक... गंगापूर रोड वरील एक शाळा..नुसती शाळाच नाही तर मित्रमंडळी तयार होण्याचा कट्टा. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला जर घरापेक्षा दुसर कुठल ठिकाण आवडत असेल तर ते म्हणजे शाळा...आणि मराठा हायस्कूल म्हणजे काय? हे अनुभवल्याशिवाय आणि मोठे झाल्यावर या शाळेच्या आठवणी जागवून डोळ्यात पाणी आल्याशिवाय कळत नाही...
आता भरपूर सुधारणा झाल्याने आताचे विद्यार्थी मुख्य इमारतीसमोर असलेल्या दरीला मुकले. आमच्या वेळी ही दरी म्हणजे अफवांचा विषय...सापांचा खेळ...खारुताईचा लपंडाव...दरवर्षी शाळेच्या सुरुवातीला छोट्या गेटजवळ साचणारा चिखल आणि त्या चिखलात चिखलमय होणारे नवेकोरे बूट...त्या चिखलाला चॉकलेटची दिलेली उपमा सर्वांना प्रचलित असायची. हिरव्या टाकीतील पाणी पिले कि तुम्हाला कोणताच आजार होणार नाही असे छाती ठोक पणे सांगणारे विद्यार्थी आज ही सापडतील आणि ही टाकी कधी साफ करता का? त्यामध्ये काही असले तर...असे नाना प्रकारच्या शंका मनात आनणारे वेळ पडली तर पाण्याची बाटली देखील भरून घेतात..
या शाळेमध्ये दररोज पांढरा शर्ट आणि खाकी पँट असलेला युनिफॉर्म पाहिजे असा दंडकच असायचा म्हणजे अजूनही आहे. तसेच त्या युनिफॉर्मला शाळेचा शिक्का असलेला बिल्ला पाहिजेच पाहिजे. तेव्हा तो पाच रुपायला दोन याप्रमाणे मिळायचा..आता तो युनिफॉर्म बदलला असावा. शाळेसाठी रोज युनिफॉर्म असल्याने नवीन ड्रेस परिधान करण्यासाठी फक्त दोनच महत्वाचे निमित्त असायचे ते म्हणजे स्वतःचा वाढदिवस आणि दुसरा म्हणजे शाळेचा वाढदिवस...त्यात जर एखाद्याचा वाढदिवस रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आला तर त्याचा मूड ऑफ..
.
.
आणि मग काय भेट खालच्या ग्राउंडवर...!
मराठा हायस्कूल नाशिक... गंगापूर रोड वरील एक नावाजलेली शाळा.. नुसती शाळाच नाही तर मित्रमंडळी तयार होण्याचा कट्टा... शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला जर घरापेक्षा दुसर कुठल ठिकाण आवडत असेल तर ते म्हणजे शाळा... आणि मराठा हायस्कूल म्हणजे काय? हे अनुभवल्याशिवाय आणि मोठे झाल्यावर या शाळेच्या आठवणी जागवून डोळ्यात पाणी आल्याशिवाय कळत नाही... लहान पनी आपन रडत शाळेत जातो, आईचा मार खाऊन जातो पण त्या वेळी शाळेचे महत्व समजत नाही... त्या शाळेच महत्व मोठ झाल की कळत...
ReplyDeleteदरवर्षी शाळेच्या सुरुवातीला छोट्या गेटजवळ साचणारा चिखल आणि त्या चिखलात चिखलमय होणारे नवेकोरे बूट... त्या चिखलाला चॉकलेटची दिलेली उपमा सर्वांना प्रचलित असायची. पिवळ्या टाकीतील पाणी पिले कि तुम्हाला कोणताच आजार होणार नाही असे छाती ठोक पणे सांगणारे विद्यार्थी आज ही सापडतील आणि ही टाकी कधी साफ करता का? त्यामध्ये काही असले तर... असे नाना प्रकारच्या शंका मनात आनणारे वेळ पडली तर पाण्याची बाटली देखील भरून घेतात… या शाळेमध्ये दररोज निळा राखिव शर्ट आणि निळी पँट असलेला युनिफॉर्म पाहिजे असा दंडकच असायचा म्हणजे अजूनही आहे. तसेच त्या युनिफॉर्मला शाळेचा शिक्का असलेला बिल्ला पाहिजेच पाहिजे. शाळेसाठी रोज युनिफॉर्म असल्याने नवीन ड्रेस परिधान करण्यासाठी फक्त दोनच महत्वाचे निमित्त असायचे ते म्हणजे स्वतःचा वाढदिवस आणि दुसरा म्हणजे शाळेचा वाढदिवस... त्यात जर एखाद्याचा वाढदिवस रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आला तर त्याचा मूड ऑफ..
या शाळेमध्ये शाळेचा परिसर आणि टपरी वरील काका... सुट्टीमध्ये त्यांच्याकडे हमखास गर्दी होते... या शाळेच्या प्रार्थना पण अतिशय सुरेल सुरात म्हटल्या जातात अर्थात त्यांना बेसूर करणारे पण असतातच... राष्ट्रगीत... गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु... नंतर क्रीडा शिक्षकांच्या सूचना असायच्या. एखाद्या सणाच्या अथवा जयंती पुण्यतिथी प्रसंगी होणारे भाषण म्हणजे ते वेळखाऊ बोअर करणारे असे असायचे पण त्यात ही एक आनंद असायचा तो म्हणजे पहिला तास बुडायचा... आणि सुरुवातच बुडाल्याने झाली तर मग दिवस सुद्धा फार आनंदात निघायचा... शाळा सुटल्यावर घरी जायची घाई असल्याने मुद्दाम रस्त्यात गर्दी करायची आता शाळेने या बाबतीतही शिस्त आणली आहे. शाळेचे एक वैशिष्ठ्य म्हणजे शाळा भरण्यापूर्वी... मोठ्या सुट्टीत... आणि शाळा सुटल्यावर खालच्या ग्राउंडवर एकाच वेळी प्रत्येक तुकडीतील दोन याप्रमाणे अंदाजे साठ ते सत्तर टीम फुटबॉल खेळते...तरी सगळे गुण्यागोविंदाने खेळ असतील असा गोड गैरसमज कोणीही करुन घेऊ नये...शेवटी शाळाच ती रुसवे फुगवे कटकटी मारामाऱ्या असणारच...
आणि मग काय भेट खालच्या ग्राउंडवर...!
मित्रा मी आमच्या आठवणी जागवल्या आणि तुम्ही तुमच्या....
Deleteथोड वैभव पेक्षा वेगळ आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletePlies एकदा वाचून बघा
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete